पिधान व अधिक्रमण

पिधान व अधिक्रमण : ग्रहणाप्रमाणेच चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात, त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते, तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होते.

 

पिधान (Occultation) : ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. यालाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे. या वेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते.

 अधिक्रमण (Transit) : पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यांपैकी एखादा अंतर्ग्रह आला, तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्य बिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यांत फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच असते.