महात्मा जोतिबा फुले


- कुळवाडी भूषण
- आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक
- युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक


जन्म            ११ एप्रिल १८२७     
जन्मगाव -        सातारा जिल्ह्यातील कटगुण 
मृत्यू -              २८ नोव्हेंबर १८९० 
वडिलांचे नाव - गोविंदराव 
आईचे नाव -    चिमणाबाई
पत्नीचे नाव -        सावित्रीबाई
मूळ आडनाव - गोऱ्हे 



जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. 

प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. 

इ.स. १८४२ मध्ये वयाच्या १४ व्य वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला.

 बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत.

जोतिबांचे आजोबा शेरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर जोतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर जोतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते.

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. 

अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. 

अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला.

संस्थात्मक योगदान

  • 3 ऑगस्ट 1848 पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
  • 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
  • 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
  • 1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
  • 1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
  • 1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
  • 10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
  • 24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना. व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
  • 1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
  • 1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
  • 1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
  • 2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.

  • महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :
  • 1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
  • 1868 – ‘ब्राम्हणांचे कसब
  • 1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.
  • 1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.
  • 1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले 
  •                              यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
  • 1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.
  • 1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
  • 1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित 
  •             झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.