१. उंदीर मामाची टोपी - 


एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.

फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले.

 मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. 

उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.  

 शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !' 

हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला घाबरला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

तात्पर्य:  शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ


२.सिंह आणि उंदीर - Sinha Ani Undir 









सिंह आणि उंदीर - Sinha Ani Undir गोष्ट-  उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर सिंहला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले. पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.

तात्पर्य:- जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र.



३.सिंह, लांडगा आणि कोल्हा 










 - Sinha Landga Ani Kolha  : जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते.

लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला वाटते.’ हे भाषण ऐकून सिंहास कोल्हयाविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलावून आणण्यासाठी एका पशूस पाठविले. 

हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्यास म्हणतो, ‘काय रे, मी इतका आजारी असता माझ्या समाचारास तू मुळीच येत नाहीस, याचे कारण काय बरे ?’ कोल्हा उत्तर करतो, ‘महाराज, आपल्यासाठी एकदा चांगलासा वैदय मी पहात होतो. 

शेवटी कालच एका मोठया वैदयाची व माझी गाठ पडली; त्यास मी आपल्या प्रकृतीसंबंधीने विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरावयास घेतले असता, हा रोग बरा होईल; याशिवाय अन्य उपाय नाही.’ 

कोल्हयाचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातडयासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेतला.

तात्पर्य:- दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.


४.प्रमाणिक लाकुडतोड्या - Pramanik Lakudtodya










प्रमाणिक लाकुडतोड्या - Pramanik Lakudtodya: ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो  दुपारी  लाकुडतोड्ण्यासाठी    नदीजवळ एक मोठ झाड  होते तेथे गेला. झाड  तोडत असतानाच  त्याची अचनक  कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो  गमावतो.

 त्याच्याजवळ  दुसरी   कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे  नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते , का रे ? का रडत आहेस तू ?' लाकूडतोड्या सारीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो. 

सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती लाकूडतोड्याला दाखवते.लाकुडतोड्या नम्रपणे  म्हणतो देवी, ' ही माझी कुऱ्हाड नाही. 

मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते.पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ' हे  देखील नाही '. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते.लाकुडतोड्या म्हणतो ' होय हीच माझी कुऱ्हाड आहे माता!'

देवी म्हणते तुझा प्रामाणिक पणा मला आवडला' या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला.प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो.

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे.


५.ससा आणि कासवाची  गोष्ट - Sasa Ani Kasav Story 

Sasa Ani Kasav Story: ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. ससा  सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. 

दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,''किती रे तु हळू'' '' कासव म्हणालं, ''पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.

सशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ''मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत''  कासवं म्हणालं '' हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का?'' ससोबा म्हणाला, '' ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.''शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,'' हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.'' ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,'' बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. '' ससा म्हणाला,'' ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.''

रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरु झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली त्यातून कोवळा पाला, गाजरं आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अदमास घेतला. कासव अजून किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास फिरकू शकणार नव्हते. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजरं खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहर्या समोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधी पाहिलीच नव्हती. 

पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरखले. ते त्या आरशात स्वत:ला न्याहाळू लागले, लांबलांब कान, छानदार डोळे, मिष्कील मिशा. आपल्या चेहर्याच्या विविध मुद्रा पहाण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यत साफ विसरले. संध्याकाळी घरी जाणार्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली.ते वेगाने टुण्ण टुण्ण उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले, कासव तिथे त्यांची वाट पहात होते. ससोबा स्वत:शीच तणतणू लागले '' पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी कसा शर्यत हारलो.'' कासव म्हणाले,'' ससोबा मला सुद्धा आजोबा आहेत. तु जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसचं मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो.'' खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरचं शर्यत जिंकता येते.

तात्पर्य- प्रयत्न केला तर यश मिळते.


 ६.कबुतर आणि मुंगीची गोष्ट - Kabutar Ani Mungi Chi Goshta











Kabutar Ani Mungi Chi Goshta: एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली.

पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली. 

त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले. अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.

तात्पर्य -  संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र. 


७.दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ - Doghanche Bhandan        

   Tisryach Labh


दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हान मुलांच्या मराठी गोष्टी: 

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. 

गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. 

बोक्याला आयतीच संधी चालून आली.  बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले.  

एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. 

असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही.  आपण दोघ भांडलो त्याचा फायदा बोक्यानी घेतला. हे उशीरा त्याच्या लक्षात आले.

तात्पर्य - दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ


८.आति तिथे माती गोष्ट - Ati Tithe Mati Story


Ati Tithe Mati Story: एक गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर  पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.

देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला 'तुला काय हवे ते मग'भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या .देव म्हणाला 'मोहरा कशात घेणार?"  भिकाऱ्याने झोळी पुढे केली.मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव  म्हणाला'मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.

पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल .भिकाऱ्याने जेव्हा अट अमान्य केली .देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू  लागला  हळूहळू   झोळी भारत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता .शेवटी जे व्हायचे तेच झाले.त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.

त्याच्याबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरात नाही.आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो.

 तात्पर्य  - कोणत्याही गोष्टीचा आति लोभ करू नये.  

९.गाढवाला मिळाली शिक्षा - Gadhvala Midali Shiksha

















Marathi Stories For Kids With Moral: एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे.

एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि मग ते दोघे पुन्हा चालू लागतात.थोडेसे मीठ पाण्यात विरघाल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि ते खूप आनंदी होऊन  पुढची वाटचाल करू लागते.आता दरोज गाढव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसारवू लागले.गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचे ठरवतो.  

दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो . गाढव त्या दिवशी  देखील मुद्दाम पाय घासारावते आणि पाण्यात पडते.आजपण त्याचा मालक उठवण्यास मदत करतो पण गाढवाला काही उठता येत नाही कारण,कापसाने पाणी शोषून घेतलेले असते.त्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी जड झालेले असते. अशा प्रकारे गाढवाला चांगली शिक्षा मिळते.

तात्पर्य - आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहावे .